ACADEMICS

DNYANDARPAN

Nurturing Young Minds for a Brighter Future
Dnyandarpan is dedicated to creating a nurturing and stimulating environment that prepares students for the challenges of the future. We strive to develop well-rounded individuals who are ready to lead with confidence, creativity, and a strong moral compass.
Learn More

नवोपक्रम 2022-2023

माझा कचरा माझी जबाबदारी

उपक्रम  प्रमुख : संगिता गोपाल सोनोने  (सहशिक्षीका) 

सातत्याने तापमान  वाढीमुळे पृथ्वीचे तापमान वाढते. वाढत्या तापमानामुळे हिमाच्छादित पर्वत वितळून महासागरातील पातळी सतत वाढत आहे. त्यामुळे पुराच्या समस्या जाणवतात. पुर आल्याने जलचर प्राण्यांची जिवितहानी होते. पुरातील पाण्यात कचरा, धूळ मिसळल्याने पाण्याचे प्रदुषण होते. तसेच वाढत्या प्रदुषणामुळे,  औद्योगीकीकरणामुळे पाण्यात नदीच्या पात्रात रासानिक कचरा मिसळून पाणी दुषीत होते. तेलवाहू जहाजातून तेल सांडल्यामुळे नदी, समुद्रातील पाणी दुषित होते.  या सर्व जागतिक समस्येपासून सुटका मिळविण्यासाठी माझा कचरा, माझी जबाबदारी, या उपक्रमाची अत्यंत गरज व महत्व आहे. आपला परिसर स्वच्छ असणे, सुदंर असणे हे आपल्या भौतिक आरोग्य व मानसिक आरोग्यासाठी देखील गरजेचे व महत्वाचे आहे. 

माध्यमिक शिक्षणाधिकारी आदरणीय सुचेता पाटेकर यांच्याशी महानगर पालीका अकोला येथे कचरा प्रश्न /व्यवस्थापन चर्चा  

स्वच्छतेचा संबंध शारीरीक तसेच मानसिक “स्वास्थाशी” आहे. “Sound mind in sound body “ स्वच्छ शरिरामध्ये एक शांत मन असते. शांत मनाने विकासाची  कामे केल्या जातात. योजना आखल्या जातात. आपल्या सभोवताली कचरा असेल तर लोक वारंवार आजारी पडतील. परिणामी  आरोग्य खात्यावर ताण येईल. देशाचा पैसा लोकांचे आरोग्य स्वस्थ ठेवण्यात खर्च होईल, विकास कामात अडथळा येईल. त्यापेक्षा आपण आपल्या कच-याची जबाबदारी घेऊन त्याची योग्य विल्हेवाट लावली किंवा त्याचा परत परत उपयोग केला तर कचरा कमी प्रमाणात निर्माण होईल. कचरा हा प्रत्येक घरात, कारखान्यात,उघोगधंदयात, बॅकमध्ये, व्यवसायामध्ये , मंदिरात निर्माण होणारा घनकचरा निर्माल्य स्वरुपात असतो. त्याचा शेतीसाठी खत म्हण्न उपयोगात येत असतो.

ज्ञान दर्पण इंग्रजी स्कूल व सी आर.बी हायस्कूल मध्ये 3 जुलै 2024 रोजी प्लास्टिक मुक्ती दिन साजरा

न्यू खेतान नगर स्थित ज्ञान- दर्पण इंग्रजी शाळेत दिनांक 3 जुलै 2024 रोजी प्लास्टिक मुक्त दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पल्लवीताई संजय कुळकर्णी यांनी भूषविले. गत 22 वर्षापासून अहिल्यादेवी महिला शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ अंतर्गत ज्ञान दर्पण इंग्लिश स्कूल जनजागृती करते व सौ.पल्लवी ताई कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध नवनवीन उपक्रम राबविते. प्लास्टिकचा पुनर्वापर करून आपण उद्योग उभारू शकतो. यातून आपला उद्योग व पर्यावरणाला कसे मदत करू शकतो, याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. 

सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मिळून प्लास्टिक मुक्तीची व सर्व परिसर प्लास्टिक मुक्त ठेवण्याची शपथ व प्रतिज्ञा घेतली. तसेच प्लास्टिक मुक्ती दिनी शपत घेताना विद्यार्थ्यांनी प्लास्टिकचा पुनर्वापर कसा करावा ,याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. 

प्रमुख मार्गदर्शक :  सौ पल्लवीताई संजय कुळकर्णी

शाळेचे संचालक :  संजय कुळकर्णी

स्कूल हेड ऍडमिनिस्टेटिव्ह :  अनिता ताई कुळकर्णी

मुख्याध्यापिका : सौ मंदा नंद किशोर भाकरे

उपक्रम प्रमुख : संगीता गोपाल सोनोने

उपक्रम सहप्रमुख : सौ. अनघा मोहरील

उपक्रम सहप्रमुख सेविका : सौ. अलकाताई सुनील वानखडे